महाराष्ट्र : वीज बिल थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापले जाणार! महावितरणचा आदेश

Pandharpur Live Online :

 राज्यातील वीज बिल थकबाकीदारांची आता बत्ती गुल होणार आहे. ग्राहकांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना दिले आहे. त्यानंतरही वीज बिल न भरणाऱया ग्राहकांचे थेट वीज कनेक्शन कापणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

महावितरणच्या एकूण वीज बिल थकबाकीचा आकडा 63 हजार 740 कोटी रुपयांवर पोहचला आहे. या थकीत रकमेच्या वसुलीसाठी महावितरणने ग्राहकांना सुलभ हप्त्याची सवलत दिली आहे. विलंब शुल्क न लावण्याचा निर्णय घेतलेला असतानाही ग्राहक वीज बिलच भरत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिघडली आहे. वीज खरेदीबरोबरच कर्मचाऱयांचे पगार, दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे.

त्याची गंभीर दखल घेत महावितरणने थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

थकबाकी वसुलीबाबत कसूर करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई

ग्राहकांना पुरवल्या जाणाऱया विजेची खरेदी करताना वीज निर्मिती कंपन्यांना नियमित पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र वाढलेल्या थकबाकीमुळे ते शक्य नाही. त्यामुळे महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना थकबाकी वसुलीचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments