अखेर समाधान आवताडे भाजपचे तिकीट मिळवण्यात यशस्वी... परिचारक आणि आवताडे यांच्या एकीमुळे भाजपाची ताकत वाढली

 


Pandharpur Live :

दामाजी  कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे भाजप चे तिकीट मिळवण्यात आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ मिळवण्यात अखेर यशस्वी  झाले  असून  परिचारक आणि आवताडे यांच्या एकीमुळं पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाची ताकत वाढली आहे.


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान महादेव आवताडे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असुन येत्या मंगळवारी समाधान आवताडे भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या भरणार असल्याचे समजते. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

समाधान आवताडे हे 2014 साली शिवसेनेकडून तर 2019 ला अपक्ष म्हणून पंढरपूर विधानसभेच्या निवडणुक रिंगणात उतरले होते. या दोन्ही निवडणुकीत आवताडे यांनी लक्षवेधी मते मिळवलेली आहेत. मागील निवडणुकांमधील समाधान आवताडे यांच्या मतांची आकडेवारी व संभाव्य मतांचा आकडा  याचबरोबर आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाची साथ याचे गणित जुळवल्यास या पोटनिवडणुकीत आवताडे जिंकतील असा अंदाज भाजपाच्या गोटातुन लावला गेला आणि त्यामुळेच भाजपाकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली असल्याचे बोलले जाते. 

..........

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

.......................

शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर विठ्ठल परिवाराचे युवानेते भगिरथ भारत भालके व त्यांच्या मातोश्री जयश्रीताई भारत भालके यांचेपैकी कुणाला तरी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून इच्छुक असलेले डीव्हीपी समुहाचे उद्योजक अभिजीत पाटील, स्वेरीचे डॉ.बी.पी. रोंगे  यांनी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही; परंतु मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांनी या पोटनिवडणुकीत लढायचे ठरवले असल्याची चर्चा आहे.

आवताडे यांची भाजपाकडूनची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर  झालेली असल्याने ही निवडणुक चुरशीची होणार यात शंकाच नाही. एकुणच हळुहळु या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत असुन भगिरथ भालके, शैलाताई गोडसे, समाधान आवताडे, नागेश भोसले अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

Post a Comment

0 Comments