धुरळा उठला... उमेदवारांच्या चाचपणीसाठी नेत्यांची पंढरीची वारी लक्षवेधी ठरणार! महाविकास आघाडी आणि भाजपासाठी सुध्दा ही पोटनिवडणुक बनली प्रतिष्ठेची!! तिरंगी लढतीची शक्यता!!!

 

पंढरपूर लाईव्ह (स्पेशल रिपोर्ट):- 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा धुरळा सध्या दोन्ही तालुक्यात उठलेला असुन कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार निवडणुक आखाड्यात उतरणार? याची उत्सुकता मतदारांना लागुन राहिली आहे. याच पार्श्‍वभुमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या रविवार दि. 21 मार्च रोजी पंढरपूरच्या दौर्‍यावर येत आहेत. याच बरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुध्दा येत्या 24 मार्च रोजी पंढरपूर दौर्‍यावर येणार असल्याची चर्चा आहे. ही सर्व नेते मंडळी अर्थातच उमेदवारांची चाचपणी करण्यासाठीच येणार असल्याचे समजते. या पोटनिवडणुकीसाठी कांही नते मंडळींनी पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढायची तयारी दर्शविल्याने मतदार संघातील तीन मातब्बर  नेत्यांमध्ये राष्ट्रवादी, भाजपा व अपक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630


................................

एकुणच या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभुमिवर आता राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे दिसुन येत आहे. प्रारंभी ही पोटनिवडणुक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती परंतु कालोघाने ही पोटनिवडणुक अनेकांच्या आमदारकीच्या आशा पल्लवीत करणारी ठरली आणि एकेक इच्छुक जनतेसमोर येऊ लागला. भगिरथ भालके, समाधान आवताडे, डॉ. बी. पी. रोंगे (सर), अभिजीत पाटील, प्रणव परिचारक, शैलाताई गोडसे व नागेश भोसले यांनी या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली असल्याची जोरदार चर्चा रंगलेलीआहे.  

राष्ट्रवादीची उमेदवारी ही  दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे सुपूत्र भगिरथ भालके यांनाच मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्येच दोन गट तयार झाल्याने याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी भगिरथ भालके ऐवजी त्यांच्या मातोश्रींना द्या! अशी मागणी राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाकडून होत असल्याची चर्चा आहे. अजितदादा पवार हे अशी गटबाजी संपवण्यात माहिर आहेत. त्यामुळे येथील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील दुरावा मिटवुन उमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भगिरथ भालके यांची उमेदवारी घोषीत करण्याची दाट शक्यता राजकीय विश्‍लेषकांमधुन व्यक्त होत आहे. 

समाधान आवताडे, प्रणव परिचारक, डॉ.बी.पी. रोंगे (सर), नागेश भोसले हे भाजपाकडून इच्छुक आहेत तर , शैलाताई गोडसे यांनी तिकीट नाही मिळाले तर अपक्ष लढायची तयारी दर्शवली आहे. उद्योजक अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी व भाजपा या दोन्ही पक्षाकडून उमेदवारीची ऑफर दिली असल्याची चर्चा आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी आपला पत्ता अजुन तरी ओपन केलेला नाही पण ऐनवेळी ते कोणता निर्णय घेतील? याची उत्सुकताही शिगेला पोहचलेली आहे. अर्थातच भाजपाचा उमेदवार हा आमदार प्रशांत परिचारक यांच्या मध्यस्थीनेच फायनल होणार असल्याने त्यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

राष्ट्रवादी व भाजपा या दोन्ही पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी येताना नेतेमंडळींना आधी इच्छुक उमेदवारांचा अभ्यास करुनच यावे लागणार आहे. मतदारांचा कौल, जनसामान्यांच्या भावना समजुन-उमजुनच दोन्ही पक्षाकडून उमेदवार निश्‍चित केले जातील हे मात्र नक्की!

Post a comment

0 Comments