सोलापूर: सव्वा पाच लाख नागरिकांना देणार 2700 टन मोफत धान्य ; अन्नधान्य वितरण अधिकारी समिंदर यांची माहिती


 
Pandharpur Live : सोलापूर, दि.29: राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वितरण करण्यास शहरातील चार परिमंडळात सुरूवात झाली आहे. या निर्णयानुसार शहरातील सुमारे सव्वा पाच लाख नागरिकांना 2700 टन धान्य मोफत वितरण केले जाणार आहे, असे अन्न धान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी सांगितले.

स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु असून नागरिकांनी धान्य घेण्यास गर्दी करु नये, सुरक्षित अंतर पाळावे, मास्क आणि सॅनिटायझरचा आवर्जून वापर करावा, असे आवाहनही श्री.समिंदर यांनी केले आहे. राज्य शासनाने अंत्योदय अन्न योजना (पिवळे रेशन कार्डधारक) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी कार्डधारक) यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना 25 किलो गहू आणि दहा किलो तांदूळ दिला जाणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जाणार आहे.

अंत्योदय अन्न योजनेच्या 6,211 कार्डधारकांना 156 टन गहू आणि 62 टन तांदूळ दिला जाईल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 4 लाख 95 हजार लाभार्थ्यांना 1,485 टन गहू आणि 990 टन तांदूळ वितरित केला जाणार आहे. शहरात सुमारे 314 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानात धान्य वितरित करण्यात आले आहे. धान्य वितरण करताना कोविडविषयक योग्य काळजी घ्यावी, त्याअनुषंगाने नियोजन करावे, अशा सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत, असेही श्री. समिंदर यांनी सांगितले.

 

*अंत्योदय अन्न योजना लाभार्थी -25,000 -156 टन गहू आणि 62 टन तांदूळ देणार

*प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी-4 लाख 95 हजार -1,485 टन गहू आणि 990 टन तांदूळ देणार

*शहरात 314 स्वस्त धान्य दुकाने

*4 परिमंडळ

*****

 

Post a Comment

0 Comments