जनतेचा विश्वास व स्व.भारतनाना यांनी केलेल्या विकास कामांवरच ही पोटनिवडणुक जिंकणार - ना.श्री जयंतराव पाटील


 

पंढरपूर ः 03- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारानिमित्त पंढरपूर येथील भालके यांच्या निवासस्थानी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना व आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.श्री जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी बोलतांना ना.श्री जयंतराव पाटील साहेब म्हणाले की, या मतदार संघातील स्व.भारतनाना भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणुक लागली असून या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलो आहे. या मतदार संघाने स्व.भारतनाना भालके यांना सलग तीन वेळा वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेले होते. या स्वाभिमानी जनतेने स्व.भारतनाना भालके यांचेवर जो विश्वास दाखविला आहे तोच विश्वास श्री भगिरथ भालके यांच्यावर दाखवावा. स्व.भारतनाना भालके यांनी संपूर्ण मतदार संघात केलेली विकास कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.


Post a comment

0 Comments