सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

Pandharpur Live : सोलापूर, दि. ३१ : श्री  छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिल्या.

कोरोना विषाणू संसर्गाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. देशमुख यांनी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर उपस्थित होते.

................................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

मुलांसाठी स्वतंत्र नियोजन करा

श्री. देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र आपण तयारीत रहायला हवे. तिसरी लाट येणार हे ग्रहीत धरुन तयारी करायला हवी. त्यासाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. त्याचबरोबर बालकांच्यासाठी तयारीचे नियोजन करा. ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यात व्हेंटिलेटर, बायपैप मशीन, ऑक्सिजन बेड याची तयारी करा. 

 चाचण्यांची संख्या वाढवा

आता संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असले तरी चाचण्यांची संख्या कमी होऊ देऊ नका. आरटीपीसीआर चाचण्यावर भर द्या. गरज भासल्यास प्रयोगशाळा संख्या वाढवा. त्याचबरोबरीने कॉंटैक्ट ट्रेसिंग वाढवा. फ्रंटलाईन वर्करच्या तपासणी वारंवार करा, त्यांचे लसीकरण करुन घ्या, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या. 

रिक्त पदे लवकर भरा

 वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. प्रथम वर्ग आणि व्दितीय वर्ग पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जातील. अधिष्ठाता स्तरावरील भरावयाच्या पदांसाठी लवकरात लवकर प्रक्रिया सुरु करा, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. यावेळी डॉ. ठाकूर यांनी सादरीकरण केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. पुष्पा अगरवाल, डॉ. रोहन खैराटकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments