बोंबला! हनीमूनच्या रात्री आला नवरदेवाला खोकला; नवरी गेली पळून...

 Pandharpur Live Online : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशभरात भीती निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपलं खासगी आयुष्य थांबवलं नाही. कोरोनाची भीती मनात बाळगून आयुष्य जगत आहेत. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. धनबादमधील एक नववधु नवरदेवाला चक्क हनीमुनच्या रात्रीच सोडून पळून गेली. महत्वाचं म्हणजे नवरदेवाला बराच काळ याची भनक देखील लागली नाही. या हनीमुनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

प्रत्येक नव्या जोडप्यासाठी त्यांनी हनीमूनची रात्र ही अतिशय खास असते. पण याच दिवशी नवरदेवाची नववधू त्याच रात्री पळून गेली तर? तर झालं असं की धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत खोलीतून बाहेर आली आणि पळून गेली.

बराच वेळ नवरदेव आतुरतेने वाट पाहत होता. बराचवेळा झाला नववधु आली नाही. घर नवीन काही गोंधळ तर झाला नाही ना असे ना ना विचार त्याच्या मनात आले. शंकेची पाल मनात चुकचुकली म्हणून त्याने नवरीचा शोध सुरू केला.

बराच काळ शोधाशोध केल्यानंतर सासरहून नवरीच्या घरी फोन लावण्यात आला. तेव्हा समजलं की ती माहेरी गेली. नेमकं असं काय घडलं? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. तर झालं असं नव जोडप्याच्या हनीमुनमध्ये कोरोना खो घातला. हनीमुनच्या रात्री नववर नववधुच्या खोलीत आला. तेव्हा तो खोकू लागला. अचानक नवरदेवाला खोकला जाणवू लागल्यामुळे नववधु घाबरली. आणि चक्क कुणालाही काहीही न सांगता माहेरी निघून गेली.

Post a Comment

0 Comments