मोगरा फुलला...मोहिनी भागवत एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोग-याच्या फुलांची आकर्षक आरास


आज मोहिनी भागवत एकादशीनिमित्त भुवैकुंठ पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली.

झेंडू, मोगरा, गुलाब व अष्टर अशा विविध फुलांच्या रंगसंगतीने केलेल्या या सजावटीमुळे मंदिर व देवाच्या गाभाऱ्यास अतिशय प्रसन्न आणि मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. रांजणगाव, जि. पुणे येथील भाविक नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील या भाविकाच्या वतीने ही आरास करण्यात आली. आरास करणेसाठी 300 किलो फुलांचा वापर करण्यात आला. कुमार शिंदे फ्लॉवर डेकोरेटर्स पुणे यांनी ही आरास केली. ही आरास करणेसाठी अंदाजे 80 हजार रूपये खर्च आला. अशी माहिती श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
@Pandharpur Live

Post a Comment

0 Comments