Pandharpur Live : अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यातील जिज्ञासूंना मार्गदर्शन होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८४ ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर* - साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया या सणाचे विशेष महत्त्व आहे. यंदा मात्र सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीतही अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यातील जिज्ञासूंना मार्गदर्शन होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८४ ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याला शेकडो जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी जिज्ञासूंनी घरबसल्या अक्षय्य तृतीयेविषयी माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अक्षय तृतीयेच्या दिवशी करावयाची श्रीविष्णु पूजा, नामजप, पितृतर्पण आदी धर्माचरणाच्या कृतीसह या सणाच्या निमित्ताने करण्यात येणारे दानाचे महत्त्व आणि काळानुरुप सत्पात्रे दान करण्याचे लाभ यांविषयी या व्याख्यानांतून सांगण्यात आले. सध्याच्या शासकीय नियमांचे पालन करून, घरी राहून अक्षय्य तृतीयेला धार्मिक कृती करण्याला प्राधान्य देऊया, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंती ते अक्षय्य तृतीया या कालावधीत ६० ठिकाणी ऑनलाईन नामसत्संगांचेही आयोजन करण्यात आले होते. या नामसत्संगात जिज्ञासूंनी श्री गुरुदेव दत्त हा सामूहिक नामजप केला. अक्षय्य तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही प्रसार करण्यात आला, तसेच विविध शहरांतील २५ चौकांमध्ये फलकप्रसिद्धी करून अक्षय्य तृतीयेचे शास्त्र समाजापर्यंत पोचवण्यात आले.
आपला नम्र,
श्री. हिरालाल तिवारी,
सनातन संस्था (संपर्क क्र. : ९९७५५९२८५९)
0 Comments