जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, निनादती चौघडे ... रंगभवन येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे मंगलमय वातावरणात शिवस्वराज्य दिन साजरासोलापूर, दि.6:  हिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र

 निनादती चौघडे या गीताने मंगलमय झालेल्या वातावरणात आज शिवस्वराज्य दिन 

 साजरा झाला.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी राज्याभिषेक झाला. हा दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. रंगभवन येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे आज सकाळी कार्यक्रम झाला.

..............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

           जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी शिवशक राजदंड शिवस्वराज्य गुढीचेही पूजन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शिक्षणाधिकारी भगवान बाबर, संजय राठोड, वित्त आणि लेखाधिकारी अजय पवार, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे उपस्थित होते.

           कार्यक्रमावेळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या भक्ती कदम, दर्शनी नेवरे, कल्पना तरळीकर आणि श्रुती कुलकर्णी यांनी अतिशय सुगम आवाजात महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत गायन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षिरसागर, कल्पना देशपांडे, भानुदास इरशेट्टी, हणमंत मोतीबने, मारुती शहाणे, लंकेश कमळे, अनिल अंकुशराव, दीपा फाटक, सलीम शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments