पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स ; पुणे विभागातील कोरोना बाधित 16 लाख 8 हजार 419 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


 
पुणे, दि. 09 : पुणे विभागातील 15 लाख  19 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 8 हजार 419  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  56 हजार 127  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 32 हजार 364 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.01 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.50 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा                    

            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 25  हजार 448 रुग्णांपैकी 9 लाख 92 हजार 471 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 15 हजार 826 आहे. कोरोनाबाधित एकूण   17 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  96.78 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 76  हजार 663 रुग्णांपैकी 1 लाख 58  हजार 147 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 81 आहे. कोरोनाबाधित एकूण  3 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 15 लाख 5  हजार 498 रुग्णांपैकी  1 लाख 48  हजार 38 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 302 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण  1 लाख 25  हजार 536 रुग्णांपैकी  1 लाख 12 हजार 764 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 150आहे.  कोरोनाबाधित एकूण 3 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 274 रुग्णांपैकी 1 लाख 8  हजार 508 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 768 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 998 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये  4 हजार 881 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 234, सातारा जिल्ह्यात 875, सोलापूर जिल्ह्यात  398, सांगली जिल्ह्यात 921 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 453 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 122 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 453, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 545, सोलापूर जिल्हयामध् 739 , सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 210 व कोल्हापूर जिल्हयामध्ये  2 हजार 175 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण  92 लाख 64 हजार 749 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  16 लाख 8 हजार 419 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

पुणे विभागातील लसीकरण

आजपर्यंत पुणे जिल्हयात 29 लाख 1 हजार 848, सातारा जिल्हयात 7 लाख 71 हजार 631, सोलापूर जिल्हयात 5 लाख 97 हजार 495, सांगली जिल्हयात 7 लाख 28 हजार 324 व कोल्हापूर जिल्हयात 11 लाख 89 हजार 799 इतक्या नागरिकांचे लसिकरण झालेले आहे.

 (टिप :- दि. 8 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Post a Comment

0 Comments