कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये MHT CET- २०२१ ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

Pandharpur Live: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान औषध निर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘MHT CET-2021ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अशी सूचना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य,मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरून कळविले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना       MHT CET-2021’  ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्याकरता मंगळवार दिनांक 08 जुन 2021 ते बुधवार दिनांक 07 जुलै 2021 पर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाची नोंदणी करण्याकरता गुरुवार दिनांक 08 जुलै 2021 ते गुरुवार दिनांक 15 जुलै 2021 असा कालावधी दिला आहे.

सदरील परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचे सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालक यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्याकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चुका होत असतात आणि धावपळही होत असते त्यादृष्टीने कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागांमध्ये ‘MHT CET-2021’ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाची संबंधित कागदपत्रे ओळखपत्र आधार कार्ड फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी ATM सोबत आणणे आवश्यक आहे. MHT CET- २०२१  संदर्भात व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिये संदर्भात अधिक माहितीसाठी कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज चे प्रवेश प्रक्रिया प्रा. ए. ए.देशमाने यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य एस पी पाटील यांनी केले आहे. सदरचे अर्ज भरण्यासाठी पंढरपूर येथे कर्मयोगी विद्यानिकेतन लींक रोड पंढरपूर,तसेच कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे येथे मोफत सुविधा उपलब्ध केली आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments