सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा; 14, 15, 16 जून रोजी आयोजन, संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन ; जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचा उपक्रम


 
सोलापूर, दि.9 : जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

                जिल्ह्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुतीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदवीव्युत्तर पदवी अशी आहे.

 या मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, विमा सल्लागार, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, बेड साईड असिस्टंट, एएनएम, बीएसस्सी नर्सिंग, जीएनएम पर्यवेक्षिका ही पदे उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली आहेत. उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा फोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

              इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 0217-2622113/2722116 या दूरध्वनीवर किंवा solapurrojgar1@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments