सोलापूर शहरात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू


प्रतिकात्मक संग्रहित छायाचित्र 

सोलापूरदि.2 : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 2 जुलैच्या रात्री बारा वाजेपासून ते 17 जुलै 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी जारी केले आहेत.

            या आदेशानुसार शस्त्रे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईलअशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ..................................

            तसेच 3 जुलैच्या रात्री बारा वाजेपासून 17 जुलै 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मिरवणुका काढणेससभा घेणेस पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहणार आहे.

            हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागताततसेच लग्नअंत्ययात्रा यांना लागू नाही. सक्षम पोलीस प्राधिकरणाने दिलेल्या पूर्वपरवानगी घेतली असल्यास हे आदेश लागू होणार नाहीत. 


Post a Comment

0 Comments