दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन उपअधीक्षक भूमी अभिलेख गिडमणी यांची माहितीPandharpur Live Video News Updates

 

सोलापूरदि. 18 : गावांच्या जागेतील शेत जमिनी सोडून (महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायत यापूर्वी गावठाण भूमापन झालेल्या गावांचे क्षेत्र वगळून) गावठाणातील जमिनींचे (मिळकतीचे) ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यात येणार आहे. सर्व्हे ऑफ इंडियाग्रामविकास विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यातर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांच्या गावठाणांचे 23 ऑगस्ट 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख टी.एल. गिडमणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

            ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे. सर्वेक्षण करून प्रतिमांचे भूसंदर्भीकरण आणि भूमीकरण करण्यात येणार आहे. यानुसार ड्रोनद्वारे गावठाण मोजणीअंती प्राप्त नकाशाचे अभिलेख अद्ययावत करून उतारे तयार करण्यात येणार आहेत.

           

            सिंदखेड, राजूरयेळेगावचंद्रहाळबंकलगीवडजीनांदणीबिरनाळसंजवाडउळेवाडी या गावात 23 ऑगस्ट 2021 रोजी सर्व्हेक्षण होणार आहे.

 

             सर्व हितसंबंधित ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे स्थळ निश्चित करण्यासाठी पुराव्याच्या कागदपत्रासह प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपल्या अनुपस्थितीमध्ये स्थानिक चौकशी आणि प्रत्यक्ष जागेवरील उपलब्ध माहितीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही श्री.  गिडमणी  यांनी सांगितले आहे.

00000

 

तांत्रिक प्रशालेत प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज उपलब्ध

11 वी विज्ञानसाठी प्रवेश


        सोलापूर, दि.18येथील महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल) मध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता 11वी विज्ञान शाखेसाठी (द्विलक्षी) प्रवेश देणे सुरु आहेत. 18 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत अर्ज विक्री सुरू असल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक एम.एस. उडाणशिवे यांनी दिली.


            इयत्ता 11वी विज्ञान शाखेसाठी द्विलक्षी अभ्यासक्रम विज्ञानसह तांत्रिक विषय मॅकेनिकल मेंन्टेनन्स व इलेक्ट्रिकल मेंन्टेनन्ससाठी प्रवेश अर्जाची विक्री चालू आहे. संस्थेतून 12 उत्तीर्ण झाल्यावर एमएच-सीईटी/जेईईद्वारे बी.ई. प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो. शिवाय डिप्लोमा इंजिनिअरिंग थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो.


 या संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळामाफक शैक्षणिक फीसुसज्ज तांत्रिक प्रयोगशाळातज्ञ व अनुभवी अध्यापक आणि भव्य क्रिडांगण व सर्व शासकीय योजनांचा लाभ येथे मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन श्री.उडाणशिवे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments