हृदयद्रावक... वेळापूर-अकलूज मार्गांवर अपघात; मायलेकीचा जागीच मृत्यू!

अपघातात मयत झालेल्या मायलेकी. 
 
Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

Pandharpur Live Online: अकलूज-वेळापूर रस्त्यावर झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज घडली. माळेवाडी इथं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समजते.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार वेळापूर येथील ओंकार दांडगे हा आपली आई छाया पांडुरंग दांडगे, बहिण श्रुती पांडुरंग दांडगे यांना दुचाकीवरून अकलूज येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होता. दरम्यान अकलूजच्या जवळ गेल्यानंतर माळेवाडी दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. 

..................

.......

................

................

.................

या अपघातात ओंकार दांडगे (20) जखमी झाला तर त्याची आई छाया दांडगे (वय ४५) आणि बहिण श्रुती (वय१८) यांचा जागीच झाला आहे, जखमी झालेल्या ओंकारला  अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकलूज पोलीस ठाण्यात कंटेनर चालक शिवशंकर हादिबसप्पा (कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.


अपघात स्थळावरील दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते. एका क्षणात या अपघाताने मायलेकीचा करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments