अखेर फरार माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अटक; ठाणे ACB ची कारवाई


 P
Pandharpur Live Video News Updates

.....................
..........................
....................
.......................
......................

Pandharpur Live Online: नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे. 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ही अटक  करण्यात आली आहे. काल वीर या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्या होत्या. त्यानंतर ठाणे एसीबीनं धडाकेबाज कारवाई केली आहे.

फरार झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर-वीर पोलिसांच्या ताब्यात असून ठाणे ACB पथकानं त्यांना अटक केली आहे. झनकर यांना अटक करण्यात ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमला यश आलं आहे.

....................

............................

..........................

.......................

..................

गेल्या दोन दिवसांपासून वैशाली यांचा शोध सुरु होता. अधिकारी पल्लवी ढगे यांनी त्यांना अटक केली आहे. वैशाली यांना आज न्यायालयात हजर करणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी डॉ. वैशाली यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच ठाणे ACB नं त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बुधवारी नाशिकमध्ये 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे म्हणजेच सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. 40 हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं आहेत.

........

Post a Comment

0 Comments