रेशनकार्ड नियमात बदल; जाणुन घ्या, लाभार्थींच्या हितासाठी नेमके कोणकोणते बदल केलेत!


 Pandharpur Live Online: रेशन कार्ड धारकांसाठी आता दिल्ली सरकारने नियम बदलले आहेत. सरकारने केलेल्या या नियमांचा लाभ सर्व कार्डधारकांना होणार आहे. आणि जे मोफत रेशन दुकानात जाऊन त्यांचे हक्काचे धान्य आणू शकत नाहीत. आता तेही नागरिक रेशन दुकानात न जाता त्यांचे रेशन मिळवू शकणार आहेत. दिल्ली सरकारने केलेल्या नियमात नेमकं काय आहे? ते जाणून घ्या.

'जे लोक वैद्यकीय कारणामुळे अथवा वयामुळे रेशन घेण्यासाठी दुकानात जाऊ शकत नाहीत, ते यासाठी दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करू शकतात. यासह दुसरी व्यक्ती आपल्या रेशन दुकानातून वस्तू आणू शकते. रेशन दुकानातून माल आणण्यासाठी दुकानात बायोमेट्रिकवर बोटांचे ठसे द्यावे लागतात, त्यानंतरच माल उपलब्ध होतो. मात्र, काही लोक काही कारणांमुळे रेशन दुकानात जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही. अशा परिस्थितीत लोकांना या नवीन नियमाचा लाभ मिळणार आहे. अशी नवी नियमावली दिल्ली सरकारने केली आहे.

ज्यांच्या कुटुंबात 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे अथवा 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक असतील आणि ते फिंगरप्रिंटसाठी दुकानात जाऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त त्या कुटुंबांनाही फायदा मिळणार आहे, ज्यांचे सदस्य अपंग आहेत अथवा कोणत्याही रोगामुळे अंथरुणावर आहेत अथवा ई-पीओएस डिव्हाइसमध्ये (E-POS device) समस्या असलेल्या लोकांना याचा लाभ होणार आहे.

नियमाचा लॅब घेण्यासाठी काय आहे प्रक्रिया?

- या नियमाचा लॅब घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करावे लागणार आहे.

- यानंतर ज्या व्यक्तीला नामांकित केले जाईल, ते त्यांच्या बिहाफमध्ये रेशन आणू शकतात.

- केवळ तेच लोक नामनिर्देशित केले जाऊ शकतात, ज्यांच्याकडे आधीपासून आधार कार्ड आहे आणि त्याच दुकानात आधीच नोंदणीकृत आहेत.

- कार्डधारकाला नामांकन फॉर्म भरावा लागेल आणि त्याचे रेशन कार्ड, आधार कार्ड सोबत सादर करावे लागेल.

- या फॉर्मसह नामांकनाची कागदपत्रेही सादर करावी लागतील.

- यानंतर ज्या व्यक्तीला नामनिर्देशित करण्यात आले, ती व्यक्ती दुकानात जाऊन माल खरेदी करू शकते.


Post a Comment

0 Comments