पाकिस्तानातील हैवानियेत.... दफन केलेला मुलीचा मृतदेह कबरीबाहेर काढून केलं हे भयंकर दुष्कृत्य!

 

Pandharpur Live Online:

पाकिस्तानात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सैतानाही लाजवेल अशी हादरवणारी घटना पाकिस्तानातील सिंध प्रातातील थट्टा जिल्ह्यातील असरफ गावात घडली आहे. या गावात तापामुळे मृत्यू झालेल्या एका 14 वर्षांच्या मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला होता. एका आरोपीने रात्री तो मृतदेह कबरीतून बाहेर काढला. कब्रस्थानापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या जंगलात त्याने तो मृतदेह नेला. त्यानंतर त्याने मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर मृतदेह तेथेच सोडून तो फरार झाला.

Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

..................

...................

आमीन चांडीओ नावाच्या 14 वर्षांच्या मुलीचा 12 ऑगस्टला तापामुळे मृत्यू झाला होता. तिच्या नातेवाईकांनी रीतीरिवाजाप्रमाणे 13 ऑगस्टला तिचे दफन केले. त्याच रात्री आरोपी रफीक चांडीओने मृतदेह कबरीच्या बाहेर काढला. त्यानंतर अर्धा किलमीटरवरील जंगलात तो फरफरट नेला. जंगलात मृतदेहावर त्याने बलात्कार केला. मृतदेह झुडपातच सोडून त्याने पळ काढला. रफीक चांडीओ सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

..................

..................

दुसऱ्या दिवशी सकाळी काही नागरिकांना मुलीची कबर खोदलेली आढळली. तसेच कबरीत मुलीचा मृतदेह नव्हता. त्यांनी तातडीने मुलीच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. पोलिसांनाही घटनेबाबत कळवण्यात आले. ग्रामस्थांनी मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर जंगलातील झु़डपात मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावरून कफन गायब होते. तसेच मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. तेथे तपासणीनंतर मृतदेहावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला.

.................

..................

संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर आरोप करण्यास सुरुवात केली. पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर तीन तासांनी ते आले. त्यामुळे ते हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आरोपीला पकडून फासावर लटकवण्याची मागणी मुलीच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केली.

...................

....................

संतप्त झालेले ग्रामस्थ आणि वाढता तणाव लक्षात घेत पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तपासाला सुरुवात केली. आरोपीला पकडण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने ठिकाठिकाणी छापे टाकले. त्यावेळी आरोपी रफीक चांडीओ एका जंगलातील झुडपात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत त्याला ठार केले. रफीक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लूटालूट, दरोडे, दहशत पसरवणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

या कृत्याने त्याने माणुसकीला काळिमा फासला आहे. पोलिसांनी चकमकीत त्याला ठार केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीच अशी घटना घडल्याने सरकार कायदा सुव्यवस्था टिकवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याआधाही नोव्हेंबर 2019 मध्ये कराचीत एका महिलेचा मृतदेह कबरीतून काढून मृतदेहावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेने सिंध परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments