सिरसाळा जिल्हा परिषद गटातील जेष्ठ नेते स्वर्गीय पंडितराव दादाराव मुठाळ यांच्या परीवारास पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट


 

Pandharpur Live Video News Updates

पोहनेर: माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय पंडितराव दादाराव मुठाळ यांचे दुःखद निधन झाल्यामुळे राष्ट्रीय सचिव भाजपा पंकजताई मुंडे यांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या परीवाराचे सांत्वन करताना पंकजताई मुंडे म्हणाल्या की, पंडितराव भाऊ मुठाळ सर्वांशी जिव्हाळा लावणारे होते. तसेच ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब व भाजप ला मानणारे नेते होते. ते जिल्हा परिषद गटातील प्रश्नाना संदर्भात ते आमच्याशी सतत संपर्कात होते. तारुगव्हाण -पोहनेर बंधारा पुर्ण करण्यासाठी सतत आमच्याशी संपर्क करत होते. 

तसेच डिग्रस येथील अवैध वाळु संदर्भात तसेच डिग्रस येथील स्थानिक मुलभूत प्रश्नाना संदर्भात कायम श्रेष्ठींशी कायम चर्चा करायचे.डिग्रस अवैध वाळु चोरी संदर्भात त्यांनी परळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या मुळे सध्या डिग्रस येथील अवैध  वाळु चोरी बंद आहे. या प्रश्नावर आवाज उठवल्या मुळे पंकजताई मुंडे यांनी अवैध वाळु चोरी जाणाऱ्या गोदावरी पाञातील ठिकाणी जाऊन पाहणी केली. 

तसेच सध्या अवैध वाळु चोरी जाते का? आसे देखील डिग्रस गावातील नागरिकांना त्याठिकाणी चर्चा केली त्यावेळेस पंडितराव भाऊ मुठाळ यांनी आंदोलन केल्यामुळे सध्या अवैध वाळु चोरी बंद झाली नागरिकांनी त्यांना सांगितले. तसेच पंडितराव मुठाळ भाऊ हे सिरसाळा जिल्हा परिषद गटातील प्रश्नावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब व आमच्याशी कायम चर्चा करायचे. तसेच डिग्रस येथील फुलावतीबाई जगन्नाथ मुठाळ यांच्या परीवाराचे देखील सांत्वन केले. तसेच पोहनेर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच वारकरी नारायण हारके यांच्या परीवाराचे देखील सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी आस्तेवाईक पणे या सर्व परिवाराची चौकशी केली तसेच या दुखाःतुन सावरून आपली व कुटुंबाची काळजी घेऊन आरोग्याची काळजी घ्या आसे सांगुन त्यांनी दुःखद कुटुंबातील सर्वांना धीर दिला. 

या वेळी त्यांच्या सोबत उपस्थित निराधार समितीचे माजी अध्यक्ष सुधाकर  पौळ, किसान मोर्चा राज्य सदस्य उत्तम माने भाजपा परळी तालुका अध्यक्ष सतिश मुंडे,  माजी जिल्हा परिषद सदस्य सिरसाळा वृक्षराज निर्मळ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश माने,चंद्रकांत देवकते, मुन्ना काळे,संतोष धानोरकर,  सरपंच आशोक कदम ,बाळासाहेब नाटकर,कृष्णा धानोरकर,  संतोष गरड, सागर देशमुख, प्रदीप देशमुख, विष्णू रोडगे ,मदन काकडे, मधुकर मोगरकर,छगन देशमुख, विठ्ठल गोरे, आबेद खुरेशी ,भारत गायकवाड इत्यादी सांत्वन दौऱ्यात उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments