महिलांनी शारीरिक सबलते बरोबरच मानसिक, आर्थिक,सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या  देखील सबल होणे काळाची गरज!- सौ. प्रियंका भट

 


Pandharpur Live Video News Updates
.....................
....................

.......................
......................

सबला नारी ही राष्ट्र सबल असल्याची पावती असते. त्यामुळे महिलांनी शारीरिक सबलतेबरोबरच मानसिक, आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक दृष्ट्या  देखील सबल होणे, ही काळाची गरज आहे. असल्याचं प्रतिपादन सौ. प्रियंका भट यांनी केले. 

मंगळवार दिनांक 10/8/21 Inner wheel Club पंढरपुर,तर्फे  'महिला सबलीकरण' या विषयावर सौ. प्रियांका भट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.  आपल्या व्याख्यानात सौ. प्रियांका भट म्हणाल्या, की  प्रत्येक महिलेने आपल्यातील,नारायणी ओळखून स्वतःस विकसित करून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. त्यासाठी स्त्रीने तिचा आत्मविश्वास वाढायला हवा. मनगटात बळ भरायला हवं .स्वतःचा सन्मान करायला हवा.वाढत्या वयाचा ताण न घेता, नवनिर्मिती,सृजनशीलता याचा ध्यास घेऊन आपले मन,विचार व जीवन समृद्ध करावे. कुटुंब,नोकरी,सामाजिक जीवन याचा समतोल राखणे ही एक मोठी जबाबदारी आजच्या स्त्रीच्या खांद्यावर असून..ती पेलण्यास ती निसर्गदत्त समर्थ आहे.


त्या पुढे म्हणाल्या की , स्त्री ही केवळ हळवी नसून वेळ पडल्यास ती दुर्गा होऊन समाजकंटकरूपी संकटांचा संहार करू शकते. त्यासाठी बरेचसे कायदे  महिला आयोग,संघटना या मदत करावयास तयार असून गरज पडल्यास त्याचे दार ठोठावले पाहीजे. आपल्या अधिकाराची जाणीव महिलांना असायला हवी.


त्या पुढे हे देखील म्हणाल्या की कायदा हा संरक्षण करण्यासाठी असून त्याचा केवळ उपद्रव देण्याच्या दृष्टीने दुरुपयोग मात्र महिलांनी टाळावा.   व्याख्यानाप्रसंगी Innerwheel club तर्फे समाजसेविका डॉ. संगीता पाटी यांचा Corona योद्धा म्हणुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी Inner Wheel Club च्या president प्रा.सौ.उज्ज्वला विरधे, secretary सौ.प्रीती वाघ, तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments