अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर मुल्ला अब्दुल घनी बरादर हे अफगानिस्तानचे नवे राष्ट्रपती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानचे (afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani ) यांनी देश सोडल्यावर तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूल (Kabul)मध्ये घुसले. तालिबानी दहशतवाद्यांनी अवघ्या आठवडाभरात जवळपास संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, तालिबानला भारताशी (India)चांगले संबंध ठेवायचे असल्याचं बोलत आहे. आजतकनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. आज तकाशी झालेल्या संवादादरम्यान तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक पूर्णपणे सुरक्षित असतील आणि कोणाला घाबरण्याची गरज नाही.
अफगाणिस्तानच्या सेनेने पांढरे कपडे घालून शरणागती पत्करली. सत्ता परिवर्तन सुरळीतपणे पार पडल्यास हानी पोहोचविण्यात येणार नाही, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.
तालिबानने दहा दिवसांत मजार-ए-शरीफ, जलालाबादचा ताबा घेतला. मजार-ए-शरीफ हे तालिबानविरोधी शहर मानले जाते. त्यानंतर जलालाबाद या शहराचा ताबा प्रतिकार न करता तालिबानला मिळाला. भारताने या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली नसून सध्या तेथे अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
काबुलमधून भारतीय दूतावासातील कर्मचारी व इतर नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान पाठविण्यात आले होते. मात्र, ते काबुलमध्ये दाखल होण्यापूर्वीच परिस्थिती बदलली. विमानतळावर एटीसीचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे विमान तब्बल एक तास काबुलच्या विमानतळाजवळ घिरट्या घालत होते. सुरक्षेसाठी वैमानिकांनी काही काळासाठी विमानाचे रडारही बंद केले होते. अखेर विमान उतरविण्यात आले. दूतावासातील सर्व कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांना घेऊन विमान मायदेशी परतले.
तालिबानचे प्रवक्ते Zabihullah Mujahid म्हणाला की, आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवे आहेत. सर्व राजनयिक येथे सुरक्षित असतील. कोणालाही देश सोडण्याची गरज नाही. आता एकीकडे तालिबानला भारताशी चांगले संबंध हवे आहेत दुसरीकडे भारताचे पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षावर काही बोलायचे नाही.
भारत आणि पाकिस्तानाच्या वादात हस्तक्षेप करायचं नाही आहे. दोन्ही देशांना त्यांच्या समस्या आहेत. यामध्ये तालिबान कोणतीही भूमिका बजावणार नाही, असंही तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. तालिबान लवकरच करणार घोषणा आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार असल्याचं समजतंय.
हा दहशतवादी समूह राष्ट्रपती भवनातून लवकरचइस्लामिक एमिरेट ऑफ अफगानिस्तानची घोषणा करेल, असं एपी या वृत्तसंस्थेनं तालिबानच्या एका नेत्याच्या हवाल्याने म्हटलं आहे. तालिबानची राजवट असताना सप्टेंबर 2001 पर्यंत हेच देशाचे नाव होते.
तालिबानी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एपीला ही माहिती दिली. कारण त्याला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही. तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करेल, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जात आहेत.
0 Comments