मंत्रालयाबाहेर व्यापाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला


 Pandharpur Live Online: गोदामात साठा केलेला धान्याचा साठा परस्पर विकणाऱया व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जळगावचा राजू गजरे (50) हा व्यापारी आज सकाळी मंत्रालयाबाहेर आत्महत्या करण्याच्या तयारीत आला होता. मात्र मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
Pandharpur Live Video News Updates
.........................
.............................

राजू गजरे हे जळगाव येथील व्यापारी आहेत. त्यांनी त्यांच्या गोदामात शेतकऱयांकडून खरेदी केलेला धान्याचा साठा करून ठेवला होता, मात्र त्यांच्या संमतीशिवाय तेथील एका व्यक्तीने गोदामातील तो धान्यसाठा परस्पर विकला. ही बाब लक्षात येताच गजरे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तेथे आवश्यक ती दखलच घेतली जात नव्हती. 

......................


स्थानिक पातळीवर दादच मिळत नसल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राजू गजरे हे आज सकाळी एका बाटलीत रॉकेल घेऊन मंत्रालयाबाहेर येणार होते आणि तेथेच रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणार होते. पण वेळीच ही बाब समजल्याने गजरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पुढचा अनर्थ टाळता आला असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राजू गजरे यांच्याकडे रॉकेलने भरलेली बाटली सापडल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक कोलेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments