जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांच्या छोट्या बहिणीची हटके प्रेमकहाणी!

Pandharpur Live Online: जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये गिनती असलेले मुकेश अंबानी यांची छोटी बहीण दिप्ती साळगावकर यांनी श्रीमंतीकडे न पाहता आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न केलं. पण त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात. अंबानी कुटुंबियांचं राहणीमान, त्यांच्या लाइफ स्टाइलची तर चर्चा होतेच. अंबानी कुटुंबिय नेहमीच प्रकाश झोतात असतात. अर्थात त्यांची चर्चा तर होणारच. कारण जगभरात या कुटुंबाचं नाव पोहोचलं आहे. पण मुकेश अंबानी यांची छोटी बहीण दिप्ती साळगावकर या सगळ्याला अपवाद आहे. मुंकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब प्रकाशझोतात असताना दिप्ती यांनी मात्र या साऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूरच ठेवलं. चर्चेत राहणं कधीच त्यांना आवडलं नाही.

धीरुभाई अंबानी यांनी आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली, त्याचवेळी ते एका इमारतीमध्ये राहत होते. मुंबईतील या इमारतीमध्ये वासुदेव साळगावकर हे त्यांचे शेजारी होते. पाहता पाहता साळगावकर आणि अंबानी कुटुंबाची मैत्री दृढ झाली. पुढे वासुदेव साळगावर यांच्या निधनानंतर अंबानी कुटुंबानं त्यांचा मुलगा दत्तराज साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.

असं म्हटलं जातं की दत्तराज साळगावकर आणि दीप्ती पहिल्या नजरेतच एमेकांच्या प्रेमात पडले होते. पाच वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या या निर्णयाचं आनंदानं स्वागत केलं. पण, हे लग्न व्यवसाय, संपत्ती, प्रसिद्धी या निकषांच्या आधारे पार पडलं नसून, प्रेम आणि निस्वार्थ प्रेम हाच त्याचा पाया होता. एका मुलाखतीत खुद्द साळगावकर दाम्पत्यानंच ही बाब शेअर केल्याचं म्हटलं जातं.

Post a Comment

0 Comments