व्यथा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचीत असलेल्या परळी तालुक्यातील एका गावाची! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत प्रलंबित आहेत अनेक प्रश्न!


 पोहनेर  (प्रतिनिधी ): पोहनेर (ता. परळी वैजनाथ ) या गावात देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हापासून ते आजतागायत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. गावातील केवळ दोनच अंतर्गत रस्ते आहेत ते सुद्धा दुरुस्त केलेले नाहीत. आता याविरुद्ध ग्रामस्थ मात्र आक्रमक झालेले आढळून येत आहेत. 

  गावात जाणारे मुख्य दोनच रस्ते आहेत. या  दोन्ही रस्त्यापैकी एक रस्ता हा भारत देश स्वतंत्र  झाल्यापासून दुर्लक्षित आहे. या गावचे नागरिक जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते. गावातील आदर्श असे सरपंच, चेअरमन झाले तरी पण हा रस्ता होत नाही.  याची गोम सर्वसामान्य नागरिकांना काही समजत नाही. 

 गावच सत्तेच राजकारण करण्यासाठी आश्वासने मिळतात. पण आजपर्यंत गावातील जेवढ्या निवडणूका झाल्या पण हा दुर्लक्षित रस्त्याचा मुद्दा कोणत्याच लोकप्रतिनिधीने सोडला नाही. ह्या रस्त्यावर आल्याशिवाय खरी गावची शोकांतिका दिसत नाही. 

या रस्त्यावर खुप गावची वाहतूक आहे. या रस्त्यावरुन अवजड असे  शेती काम करणारे ट्रॅक्टर देखील या वाटेवरून प्रवास करत नाही. मग बाकी वाहने घेऊन जाणे तर खुपच जिकरीची बाब आहे. 

केवळ रस्त्यावरून नाईलाजास्तव गाडीबैल घेऊन जावे लागते. या रस्त्यावरून गेल्यानंतर मुक्या बैलांच्या पायांना नक्कीच दुखापत होते. मग काय या रस्त्यावरून नागरीक ग्रामपंचायत कार्यालय ,सोसायटी कार्यालय कडे कसे जाणार? व आपल्या या रस्त्याच्या व्यथा सांगाव्यात? हेच गावकऱ्यांना समजत नाही.  केवळ मतलबी राजकारण करण्यासाठीच गावचे लोकप्रतिनिधी व्यस्त असतात. गावाच्या आशा किती तरी योजना आडबाजुला पुर्ण केल्या जात आहेत. 

..................

.......

................

................

.................

याच रस्त्यावरुन बालवाडीचा विद्यार्थी कसा प्रवास करणार? शाळेत जाणारा पहिला ते चौथी चा विद्यार्थी कसा जाणार? सध्या शाळा चालू नसल्याने त्याला काही आडचण नाही. त्याला शाळेच्या मैदानावर खेळायला जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही. त्यामुळे लहान मुले खेळण्यांच्या छंदापासुन कोसोदुर जात आहेत. 

गावात विद्यार्थी बालकांना खेळण्यासाठी केवळ शाळेच मैदान आहे. याच रस्त्यावरून गावातील वयोवृध्द नागरिकांना बाजारपेठेत कसरत करत जावे लागत आहे. बाजार पेठे कडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गावच्या बाजाराची आवकळा ठरत आहे. त्यामुळे गावाला भाजीपाला पुरवणाऱ्या व्यापारी यांना नाईलाजाने कुठेही बसावे लागते. 

शाळेत येणाऱ्या शिक्षकांना देखील हा रस्ता ञासदायक ठरत आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात नागरिकांना, विद्यार्थी यांना जावे लागत आहे. हा रस्ता करण्यासाठी खरच कोणी आपले राजकीय व सामाजिक योगदान देईल का? की हा रस्ता पोहनेर गावासाठी कायम शोकांतिकाच ठरेल? असा प्रश्नं गावकरयांना छळत असून याकडे नेतेमंडळींनी लक्ष घालून गावातील प्रमुख प्रश्नं सोडवणे आवश्यक बनले आहे. 

Post a Comment

0 Comments