सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त(ACP) प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार जाहीर


 Pandharpur Live Video News Updates

.....................
....................
.......................
......................

सोलापूर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशातील 152 पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी (Award of "Union Home Minister's Medal for Excellence in Investigation" for the year 2021) म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्या 152 अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली. 


        या 152 अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे यांचा समावेश आहे. त्यांची उत्कृष्ट तपास अधिकारी या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 प्रीती टिपरे या सोलापूर पोलीस आयुक्तालयात मागील दोन वर्षांपासून गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

अनेक गुन्हे उकल करण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पंढरपूर लाईव्ह कडून त्यांचे अभिनंदन आणि पुढील तडफदार कामगिरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments