भारतात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट ; दिल्लीमध्ये कडक सुरक्षा !


 
Pandharpur Live Online : भारतातील काही मंदिर, काही राजकीय नेते आणि गर्दीची ठिकाणं 'इसिस खुरासान' या दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळतेय.सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करु शकतात. जे इस्राईलशी संबंधित आहेत. दहशतवाद्यांकडून परदेशी व्यक्तींनाही टार्गेट केलं जाऊ शकतं. या दहशतवादी गटासाठी काम करणाऱ्या काही व्यक्तींना कर्नाटक आणि काश्मीरमध्ये नुकतीच अटक करण्यात आलीय. चौकशीनंतर ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील आयएस ऑपरेटरच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय. इसिसच्या दहशतवादी गटाकडून रचण्यात येणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या कटात यांचाही हात असल्याची शक्यता समोर येतेय.

दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. याआधी देखील यहूदी हे नेहमीच दहशतवाद्यांच्या निशान्यावर राहिल्या आहेत. जानेवारी 2021 मध्ये इस्राईल एंबेसी जवळ बॉम्बस्फोट झाला होता. पण यामध्ये कोणीही जखमी झालं नव्हतं. याशिवाय 13 फेब्रुवारी 2012 मध्ये इस्राईलच्या दुतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाला होता.

अफगाणिस्तानमधील परिस्थिती आज जगासमोर आहे. देशाची राजधानी दिल्ली वर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. दिल्लीत इस्राईलचे नागरिक दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. दहशतवादी पुन्हा एकदा यहूदी लोकांना लक्ष्य करु शकतात. गुप्तचर विभागाने अलर्ट दिला आहे. Jewish Holiday 6 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना इसिसचे प्रशिक्षित घुसखोर - दहशतवादी भारताला हादरा देण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर भारतातील मंदिरं, काही राजकीय नेते आणि गर्दीची ठिकाणं असल्याचंही सांगितलं जातंय. गुप्तचर विभाग अफगाणिस्तानातील परिस्थितीनंतर सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा यानंतर अलर्टवर आहेत.


Post a Comment

0 Comments