सिंहगड इन्स्टिट्युट मधील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड


 पंढरपूर: प्रतिनिधी

सिंहगड इन्स्टिट्युट मधील ३ विद्यार्थ्यांची "एनव्हिडिया ग्राफिक्स प्रा. लिमिटेड" हि कंपनी पुण्यात कार्यरत असुन इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्पादन करणारी कंपनी आहे. "एनव्हिडिया काॅर्पोरेशन ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जी डेलावेअर मध्ये समाविष्ट आहे. कॅलिफोर्नियाच्या सांता क्लरा येथे आहे. गेमिंग आणि व्यवसायिक बाजारासाठी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटस् आणि मोबाइल काॅम्प्युटींग, आँटोमोटिव्ह मार्केटसाठी चिप युनिट्सवरील प्रणाली डिझाईन करत असलेल्या "एनव्हिडिया ग्राफिक्स प्रा. लिमिटेड" या कंपनीत या तीन कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली, असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी दिली.


    सिंहगड इन्स्टिट्युटची प्रत्येक वर्षी प्लेसमेंटची टक्केवारी दरवर्षी वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त होत आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे अशा पद्धतीची प्रगती विद्यार्थी करत आहे. "एनव्हिडिया ग्राफिक्स प्रा. लिमिटेड" या कंपनीत निवड झालेल्या  अनशुला अवास्थी, कृष्णा लाखी व स्नेहल माने या विद्यार्थ्यांना वार्षिक पगार ९.५ लाख रूपये मिळणार आहे. 

"एनव्हिडिया ग्राफिक्स प्रा. लिमिटेड" या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सिंहगड इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments