‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सायंकाळची पुजा व आरती धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अ‍ॅड. श्री.अमरजित पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

 

Pandharpur Live : 'पंढरपूर लाईव्ह' कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अ‍ॅड.श्री.अमरजित पाटील यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.


यावेळी अ‍ॅड.श्री.अमरजित पाटील यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी विघ्नहर्ता श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी अ‍ॅड.श्री.अमरजित पाटील यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी आदी उपस्थित होते. यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक श्री.संजय खरात, नितीन सरडे, गणेश पायाळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments