नातेवाईकांनी खुप शोधले परंतु अखेर विहीरीमध्ये पाण्यावर तरंगताना आढळला शेतकऱ्याचा मृतदेह!


 
हातकणंगले (पञकार - अनिल उपाध्ये)  दि.4/9/21

हेरले इथ  विहीरीत पाय घसरुन पडुन वसंत दत्तु माने वय 50 या शेतकर्यांचा मृत्यू झाला.आज सकाळी मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला.

हातकणंगले तालुक्यातील  हेरले इथले वसंत दत्तु माने वय 50 हे शेतकरी शुक्रवार दि.3 रोजी नेहमीप्रमाणे पंचगंगा नदीकड असलेल्या  आपल्या शेतात गेले होते.दुपारी घरी परतत असताना हातपाय धुण्यासाठी ते मगदुम यांच्या विहीरीत गेले होते.पाय घसरुन  पाण्यात पडल्याने बुडुन त्यांचा मृत्यू झाला होता.

राञी ते घरी न आल्यान कुटुंबातील लोकांनी शोध शोध केली पण ते आढळून आले नव्हते.आज शनिवार दि 4 रोजी एक मृतदेह विहीरीत तरंगताना काही शेतकर्यांना  दिसुन आला.त्यांनी  माने  यांच्या नातेवाईकांना बोलावुन घेतल. खातरजमा करुन घेतली.मृताची ओळख पटल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी साठी हातकणंगले इथल्या  ग्रामिण रुग्नालयात आणण्यात आला.

शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यांच्या पश्च्यात आई,वडील,पत्नी,मुले ,भाऊ ,भावजय आसा परीवार आहे.या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली आहे.

Post a Comment

0 Comments