‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न

  
Pandharpur Live: ‘पंढरपूर लाईव्ह’  कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 18 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.


यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी ‘पंढरपूर लाईव्ह‘ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.



लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी सौ. साधनाताई भोसले यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरती ओंकार बसवंती, पंढरपूर लाईव्हचे प्रतिनिधी प्रितीश चव्हाण व हर्षद कोळी आदी उपस्थित होते.










Post a Comment

0 Comments