‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सकाळची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.नागेश फाटे यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 14 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.नागेश फाटे यांचे शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.


यावेळी श्री.नागेश फाटे यांनी ‘पंढरपूर लाईव्ह‘ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी व विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.नागेश फाटे यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली.

Post a Comment

0 Comments