‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सायंकाळची पुजा व आरती समाजसेवक श्री.संजय (बाबा) ननवरे यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live: 'पंढरपूर लाईव्ह' कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 19 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती पंढरीतील समाजसेवक श्री.संजय (बाबा) ननवरे यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.

यावेळी श्री.संजय (बाबा) ननवरे यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी विघ्नहर्ता श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.संजय (बाबा) ननवरे यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी विकास गायकवाड, राहुल साळुंखे, तुकाराम तारापुरकर व समाजसेवक ओंकार बसवंती आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments