Pandharpur Live: सालाबादप्रमाणे याही वर्षी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या कालावधीत पंढरीतील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या शुभहस्ते श्रीगणेशाची नित्यपुजा व आरती विधीवत करण्यात आली. आज ‘‘श्री’’ ची उत्तरपुजा पंढरपूर लाईव्हचे शहर प्रतिनिधी श्री. विकास माने यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली. पौरोहित्य श्री.विक्रांत विप्र गुरुजी यांनी केले.
यावेळी श्री.विकास माने यांनी सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी विघ्नहर्ता श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यमातुन तत्वनिष्ठ पत्रकारिता करण्यासोबतच विविध विधायक कार्य करण्याची परंपरा आम्ही जोपासत आहोत. विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातुन ‘पंढरपूर लाईव्ह’ ने आपले वेगळेपण आणि स्वच्छ प्रतिमा जपलेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सन्मान व्हावा आणि पंढरपूर लाईव्हला सदैव सहकार्य करणार्या मान्यवरांना ‘मान’ मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो. अखेर अनंत चतुर्दशी नंतर पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्री.गणेशाची विधीवत उत्तरपुजा पंढरपूर लाईव्हचे शहर प्रतिनिधी विकास माने यांच्या शुभहस्ते पार पडली व गणरायाला निरोप देण्यात आला.
यावेळी पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे, पंढरपूर लाईव्हचे तालुका प्रतिनिधी लिंगेश भुसनर, चि.प्रेम भगवान वानखेडे आदी उपस्थित होते.
0 Comments