VIDEO : शिखर धवनला वडिलांनी धू - धू धुतले , प्लेऑफमध्ये न पोहचल्यामुळे नाराज

 


Shikhar Dhawan Viral Video Punjab Kings IPL 2022 Playoffs : पंजाब किंग्सचा विस्फोटक सलामी फलंदाज शिखर धवनने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.शिखर धवनने यंदा 460 धावा केल्या आहेत. पण शिखर धवनचा पंजाब संघाचं साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आले... पंजाबचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिलाय. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर शिखर धवनने एक व्हिडीओ पोस्ट केलाय.. इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओत शिखर धवनवा त्याचे वडिल मारत असल्याचे दिसत आहे... शिखर धवनने हा व्हिडीओ तयार केलाय.. या मजेदार व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिलेय की, प्लेऑफमध्ये संघ न पोहचल्यामुळे वडिल नाराज झाले असून त्यांनी धुलाई केली.

शिखर धवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिखर सोशल मीडियावर सक्रीय असतो.. तो चाहत्यांसाठी अनेक मजेदार व्हिडीओ पोस्ट करत असतो. असाच मजेदार व्हिडीओ पोस्ट केलाय.. या व्हिडीओत वडिल शिखर धवनला चोपत असल्याचे दिसत आहे. शिखर धवनचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही... धवनने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ''Knock out by my dad for not qualifying for knock outs''

शिखर धवनच्या मजेदार व्हिडीओला अल्पावधीतच चार लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तर कमेंट्सचा वर्षाव पडलाय. चाहत्यांसोबतच क्रिकेटरनेही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. स्पोर्ट्स अँकर गौरव कपूरने लिहिलेय की, ''फुल फॅमली ड्रामा.'' माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहनेही मजेदार कमेंट केली आहे. भज्जी म्हणतोय, ''बापू तेरे से भी ऊपर का एक्टर निकले...क्या बात है.'' इरफान पठाननेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments