पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ जवळ भीषण अपघात ! सिद्धेश्वर निंबोडीचे वृद्ध ठार , तर तिघे गंभीर जखमी ! Pandharpur Live News: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी जवळ दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला.या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती पोलीसांनी दिली.

रामदास कृष्णा झगडे ( रा.सिद्धेश्वर निंबोडी,वय वर्ष७० ) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. बुधवारी ( दि.२५ ) दुपारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ एमआयडीसी चौकात हा अपघात झाला. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कारने महामार्गावरील लोखंडी बॅरेकेट तोडुन दुभाजकाच्या पलीकडे जाऊन सोलापुरहुन पुण्याला जाणाऱ्या कारवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला.हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांची मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार शंकर वाघमारे, श्रीरंग शिंदे, पोलीस मित्र स्वप्नील कांबळे, मंगेश भगत, इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातातील जखमींना वाहनांमधून बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघात ग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आली.

Post a Comment

0 Comments