नेपाळ येथे झालेल्या योग स्पर्धेत गार्गी महेश खिस्ते हीला प्रथम पारितोषकPandharpur Live News:पंढरपुरातील द.ह.कवठेकर प्रशालेची विदयार्थिनी गार्गी महेश खिस्ते हीने स्पोटर्ंस फेडरेशन ऑफ नेपाळ ने आयोजित केलेल्या  योग स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटात प्रथम पारितोषक प्राप्त केले.

विविध देशांच्या खेळाच्या संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करीत असतात.नेपाळ मधील पोथरा येथे दि.25 ते 28 मे या काळात विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.पंढरपुरात के.डी.योगा अ‍ॅकेडमीच्या वतीने या स्पर्धासाठी नामांकने पाठविण्यात आली होती.या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडीयाच्या स्पर्धात भाग घेणे व विशेष प्राविण्य दाखविणे आवश्यक असते त्यानुसार बारामती व पुणे येथे झालेल्या स्पर्धेत गार्गीसह अनेक खेळाडुंनी भाग घेतला होता.त्यामध्ये गोल्ड मेडल सह प्रथम पारितोषक प्राप्त केल्या नंतर तीची नेपाळ येथील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.व त्या स्पर्धेतही गार्गी खिस्ते हीने वैयक्तिक योगा यामध्ये 14 वर्षे वयोगटात गोल्ड मेडलसह प्रथम क्रमांकाचे पारितोषक प्राप्त केले .तसेच पंढरपुरची द.ह.कवठैकर प्रशालेची आर्या चारुदत्त ताठे हीलाही या स्पर्धेत पारितोषक प्राप्त झाले आहे.गार्गी व आर्या हीला के.डी योगा अ‍ॅन्ड डान्स अ‍ॅकेडमीचे कीरण देठे,द.ह.कवठेकर प्रशालेचे योगशिक्षक चिंतामणी दामोदरे व गार्गी हीची आई योगशिक्षीका सौ गौरी खिस्ते यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी व प्रशालेचे सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन तिला मिळाले.तीच्या या यशा बध्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Post a Comment

0 Comments