सोलापूर : सोलापुरात आई (Mother) आणि मुला (Son)ने एकाच साडीने गळफास घेत (Suicide ) केल्याची घटना सोलापुरातील शेळगी परिसरात उघडकीस आली आहे.
घरातून हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी डोकावून पाहिले
सोलापुरातील शेळगी परिसरात उमादेवी आणि दिग्विजय हे दोघे मायलेक राहतात. त्यांच्या घरातून सकाळपासून कोणत्याच हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता मायलेक एकाच साडीने गळफास घेतल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी तात्काळ जोडभावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. दरम्यान, या मायलेकांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरुन केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस सर्व बाजूंनी अधिक चौकशी करत आहेत.
0 Comments