Kolhapur : कोल्हापूरात पिसाळलेल्या मांजराचा पाच जणांना चावा , गावात धुमाकूळकोल्हापूर – अनेकदा प्राणी हल्ले करतात. पण मांजराने हल्ला (Cat attack) केल्याचं क्वचित ऐकायला मिळतं.

कोल्हापूरात (Kolhapur) असाचं एक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांने आत्तापर्यंत गावातल्या पाच जणांना चावा घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. मागच्या बाजूने येऊन मांजर चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये घबराहट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पोखले (Pokhale) गावातील ही घटना असून मांजराचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. माजराने आत्तापर्यंत चावा घेतल्या इसमांवरती कोडोली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकांना जखमी केल्याने गावात धुमाकूळ आहे. हे मांजर पिसाळले असून लोकांना चावत असल्याचे नागरिक सांगत आहेत. शेजारी शाळा असल्याने पालक देखील चिंतेत आहेत.
मांजर चावत असल्याने गावात धुमाकूळ

पन्हाळा तालुक्यातील पोखले गावात ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या नागरिकांवरती कोडोलीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काल सकाळच्या सुमारास सुभाष पाटील हे कामानिमित्त घरातून बाहेर निघाले होते. त्यावेळी रस्त्याने चालत असताना मागून आलेल्या मांजराने त्यांच्यावरती हल्ला केला. त्यावेळी मांजराने त्यांच्या पायाला दोन ठिकाणी चावा घेतला. पाटील यांनी हल्ला होताचं आरडाओरड केल्याने मांजराने तिथून पळ काढला. त्यानंतर पिसाळलेले मांजर एका गल्लीत शिरले. तिथं त्याने विमल पाटील यांना चावा घेतला. आत्तापर्यंत शहाजी पाटील, सुरेखा पाटील, विमल पाटील, दिनकर जाधव यांना जखमी केले असून सगळ्यांवरती उपचार सुरू आहेत.


शेजारी शाळा असल्याने नागरिक चिंतेत

पिसाळलेले मांजर नागरिकांच्यावरती अचानक हल्ला करीत आहे. मांजर शरिराने धिप्पाड आहे. हल्ला केल्यानंतर घराच्या वरच्या बाजूला मांजर जात असल्याने त्याला पकडणं अवघड झालं आहे. ज्या गल्लीत मांजर आहे, तिथं शेजारी शाळा असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मांजराला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी गावातील रहिवाशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments