बावधन , सूस , म्हाळुंगे या गावांसाठी समान पाणीपुरवठा योजनेचे 170 कोटी रुपये मंजूर

 


Pandharpur Live : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या बावधन, सूस, म्हाळुंगे या गावांसाठीच्या समान पाणीपुरवठा योजनेचे 170 कोटींच्या पूर्वगणनपत्रकाला मान्यता देण्यात आली.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.उर्वरित गावांसाठी 30 जूनपर्यंत पूर्वगणन सादर करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 34 गावांमध्ये मुख्य शहराप्रमाणे समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या कामाची सुरुवात सूस, म्हाळुंगे आणि बावधन या गावांतून करण्यात येणार आहे. या कामासाठी 170 कोटींचे इस्टिमेट (पूर्वगणनपत्रक) तयार करण्यात आले आहे. उर्वरित गावांसाठी इस्टीमेट 30 जूनपर्यंत तयार करण्याच्या सूचना केल्याचे विक्रमकुमार यांनी सांगितले.

सूस, म्हाळुंगे आणि बावधन या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला.

Post a Comment

0 Comments