सोलापूर : वेल्डिंग दुकानातील ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फोटनिराळे वस्ती येथील वेल्डिंग दुकानातील ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. शनिवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान निराळे वस्ती रोडवरील वेल्डिंगच्या दुकानातील ऑक्सिजन टाकीचा स्फोट झाला.

स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सोलापूर- शहरातील निराळे वस्ती येथील वेल्डिंग दुकानातील ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. शनिवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान निराळे वस्ती रोडवरील वेल्डिंगच्या दुकानातील ऑक्सिजन टाकीचा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाला याबाबत माहिती मिळताच पहाटेच्या सुमारास शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली.सोलापूर : वेल्डिंग दुकानातील ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फो

परिसरातील घरांच्या काचा फुटल्या - पहाटे तीनच्या सुमारास वेल्डिंग दुकानात आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.आगीने रोद्र रूप धारण करत ऑक्सिजन टाकीला आग लागली. यामध्ये ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत गेला. परिसरातील अनेक लोक घाबरून पळून घराबाहेर आले. तसेच आजूबाजूला असलेल्या घरांच्या काचा फुटल्या.

आजूबाजूच्या तीन दुकाने भस्मसात - स्फोटामुळे आजूबाजूच्या दुकानांनाही आग लागली. स्फोट इतका भयानक होता की स्फोट झालेल्या टाकीचे तुकडे रस्त्यावर उडून पडले होते. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी आले. तसेच त्या भागातील माजी नगरसेवक देवेंद्र कोठे हे घटनास्थळी तात्काळ पोहोचले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Post a Comment

0 Comments