*पंढरपूर सिंहगड मध्ये " जागतिक वसुंधरा दिवस" साजरा*प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती


पंढरपूर: प्रतिनिधी 


एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

 पर्यावरण तसेच जागतिक जंगल तोड या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून सर्वञ साजरा केला जातो. याच अनुषंगानेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये जागतिक वसुंधरा दिवस अर्थात "वर्ल्ड अर्थ डे" या कार्यक्रमा प्रसंगी अर्थ आणि विज्ञान मंत्रालय व भारत सरकारचे माजी सेक्रेटरी डाॅ. एम. राजीवन यांनी वातावरण बदलाचे विज्ञान म्हणजेच सायन्स ऑफ क्लायमेट चेंज याविषयी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग पर्यावरण मातृभूमी वसुंधरा यांचा कसा बचाव करायचा शिवाय सेव्ह नेचर सेव्ह अर्थ या म्हणीप्रमाणे अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वय म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी विद्यार्थ्यांना वर्ल्ड अर्थ डे संदर्भामध्ये जागृती करून डॉ. एम. राजवन यांनी दिलेल्या अनमोल संदेशाचे पालन करून निसर्ग तसेच वसुंधरा वाचविण्याचे आव्हान केले.     या कार्यक्रमात काॅलेज मधील ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये जागतिक वसुंधरा दिवस निमित्त सहभागी विद्यार्थी.

Post a Comment

0 Comments