*○ पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा संपन्न*

 


*देशाचा सुसंस्कृत नागरीक घडविण्याचे काम सिंहगड कॉलेज करत आहे- विनोद शेंडगे*


*○ पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा संपन्न*


पंढरपूर: समता क्रांती न्यूज 


सद्याची परिस्थीती खुप भयानक आहे माञ सिंहगड कॉलेजची प्लेसमेंट प्रगती व शैक्षणिक वाटचाल पाहिली तर समाधान वाटले. सिंहगड कॉलेज विद्यार्थ्यांना सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांना नुसतेच घडवायचे नाही तर देशाचा सुसंस्कृत नागरीक घडविण्याचे काम सिंहगड कॉलेज करत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सिंहगड कॉलेज विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या गाभाऱ्यात नेण्याचे काम करत असून याचा आम्हा पालकांना अभिमान असल्याचे मत पालक विनोद शेंडगे यांनी व्यक्त केले. 

    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये  शुक्रवार दिनांक १७ जुन २०२२ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा आयोजित करण्यात आला. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या पालक मेळाव्याचे उद्घाटन पालक प्रतिनिधी म्हणून विनोद शेंडगे काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अनिल जाधव आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   सिंहगड कॉलेजच्या वतीने उपस्थित राहिलेले पालक प्रतिनिधी विनोद शेंडगे यांचे स्वागत काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

       मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी म्हणाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहे. विद्यापीठाचा अभ्यासक्रम व्यतिरिक्त इतर स्पर्धा हि मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात येत असतात.विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असुन याशिवाय उद्योजक क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सिंहगड कॉलेज करत आहे. इंडस्ट्रीयल व्हिजिट विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय राबत आहे. याशिवाय महाविद्यालयात ऑनर्स ड्रिग्री असुन याचा विद्यार्थ्यांना खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार  असल्याचे मत डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी पालक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

     ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर बोलताना म्हणाले, सिंहगड काॅलेज हे विद्यापीठाच्या निकालात नेहमीच अग्रेसर आहे.   प्लेसमेंटसाठी आवश्यक असलेले गुण विद्यार्थ्यांना काॅलेज मधील शिक्षणातून दिले जाते. कोविड मुळे आयटी कंपन्यात "वर्क फ्राॅम होम" हे काम चालू आहे. तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कंपनीत मुलाखती द्वारे निवड करण्यात येत असते. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत डॉ. समीर कटेकर यांनी व्यक्त केले.

   यादरम्यान काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments