आषाढी यात्रा कालावधीमधे पाणीटंचाईवर मात करणेसाठी पंढरीतील विंधनविहीरी सुरु कराव्यात; हिंदुमहासभेची मागणी;

 


आषाढी यात्रा कालावधीमधे पाणीटंचाईवर मात करणेसाठी पंढरीतील विंधनविहीरी

सुरु कराव्यात; हिंदुमहासभेची मागणी;

तभा वृत्तसेवा,

पंढरपूर दि 14 जूनः-‘आषाढी यात्रेच्या कालावधीमधे पंढरपूर शहरामधे

साधारणपणे 15 लाखांहुन अधिक भाविक भक्त येण्याची शक्यता प्रशासनाने

व्यक्त केली आहे. यामुळे प्रशासनाची तयारी सुरु आहे. मात्र या येणार्‍या

भाविकांना पाणी पुरवठा पुरेसा होणार का? या एका महत्वाच्या प्रश्‍नाकडे

प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी पंढरपूरात सध्या बंद अवस्थेमधे

असलेल्या विंधन विहीरी पुन्हा सुरु कराव्यात. अशी मागणी पंढरपूर

हिंदुमहासभेने केली आहे.

        आज पंढरपूर हिंदुमहासभेचे अध्यक्ष बाळाराव डिंगरे, विवेक बेणारे,

आदित्य फत्तेपुरकर, कृष्णा वाघमारे, ह.भ.प. मोरे महाराज, यांनी पंढरपूर

नगरपालीकेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर यांची भेट घेतली. या विषईचे

निवेदन त्यांना यावेळी देण्यात आले. यावेळी वाळुंजकर यांनी हा विषयवरिष्ठांपर्यंत पोहोचवुन वारकरी भाविकांची पाण्याची सोय करणेबाबत प्रयत्न

करु असे आश्‍वासन दिले.

       पंढरपूरात चार मोठ्या यात्रा भरतात. ईतरवेळीही दररोज हजारो भाविक

पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत येत असतात. या

येणार्‍या भाविकांना पुरेसा पाणीपुरवठा करणेसाठी नगरपालीकेने आपल्या

खर्चाने विविध ठिकाणी विंधन विहीरी खोदल्या आहेत. तर या विहीरींवर

विद्युत पंपही बसविले आहेत. मात्र कोरोनाच्या काळात या विद्युत मोटारींचे

विजेचे बील नगरपालीकेेने भरले नाही. या कारणाने या मोटारींचा विद्युत

पुरवठा वीज बोर्डाने खंडीत केला आहे. हा विज पुरवठा पुन्हा सुरु करुन या

बोअर सुरु कराव्यात. अशी मागणी यावेळी केली आहे.

      आगामी आषाढी यात्रेमधे किमान 15 लाख भाविक पंढरीत येतील असा अंदाज

प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोरोना काळातील दिड वर्षांमधे एकही यात्रा

भरु दिली नाही. यामुळे या वारीमधे भाविक मोठ्या प्रमाणावर पंढरीत येणार

यात शंका नाही. मात्र या भाविकांना पाणी पुरवठा होणेसाठी या बोअर सुरु

होणे गरजेचे आहे. जर कायम स्वरुपी या बोअर सुरु करता आल्या नाही तर किमान

वारी पुरते तरी या बोअर सुरु करुन भाविकांची सोय करावी. अशीही मागणी या

निवेदनामधे केली आहे.

    चौकटः- यावेळी पंढरपूर नगरपालीकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी

यांचेबरोबर फोनवर या प्रश्‍नाविषई चर्चा केली असता त्यांनी या बोअर सुरु

करणेविषई नगरपालीका प्रशासन सकारात्मक भुमिका अवश्य घेईल. आषाढी

यात्रेमधे येणार्‍या भाविकांच्या सोईविषई कोणताही हलगर्जीपणा होणार नाही.

असे आश्‍वासन या निवेदन देणेसाठी गेलेल्या हिंदुमहासभेच्या शिष्टमंडळाला

दिले.

Post a Comment

0 Comments