माझ्या अंगात पैलवानाचे रक्त , विरोधकांना त्यांची जागा दाखवणार : भगीरथ भालके माझ्या अंगात पैलवानाचे रक्त , विरोधकांना त्यांची जागा दाखवणार : भगीरथ भालके

 माझ्या अंगात पैलवानाचे रक्त असून चुकीच्या पद्धतीने मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही विरोधकांनाही त्या पद्धतीने त्यांची जागा दाखवणार असल्याचे मत विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी व्यक्त केले.भालके यांनी नुकताच खेड भोसे, देवडे, आवे तरटगाव आदी भागात गावभेट दौरे केले. यावेळी त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.


कै. आमदार भारत नाना भालके यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलेली विकासाभुमूख  कामे जनतेने बघितली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विकास काय असतो हे उघड्या डोळ्याने बघितलेले आहे, नानांनी सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना मानसिक आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यात  विखुरलेले आहे.  अडचण आणली नाही. अडगळीत पडलेल्या युवराज पाटलाला समाजात आणून दहा वर्षे संचालक पद दिले, त्यांनी भारतनाना असताना कोणतीही तक्रार केली नाही. तेच युवराज पाटील साखर आयुक्त , हायकोर्ट आदींकडे तक्रारी दाखल करून अडचणी निर्माण करत आहेत. आज कामगारांना पगार देत नसल्याचे सांगत आहेत. पंचवीस वर्षे युवराज पाटलांनी सर्वसामान्य जनतेचे संपर्क ठेवला नाही. परंतु भगीरथ भालके सहा महिन्यापासून नॉटरिचेबल असल्याचे सांगत आहेत.


 सभासद व कामगारांचा रोष भगीरथ भालके यांच्यावर कसा येईल हे काम युवराज पाटील यांनी केले आहे. असे भगीरथ भालके म्हणाले. 


 यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, संचालक गोकुळ जाधव, दशरथ खळगे, सुधाकर कवडे, कांतीलाल भिंगारे,  उत्तम नाईकनवरे, नंदकुमार पाटील, हनुमंत पवार, बंडू पवार, नारायण शिंदे ,  शालिवाहन कोळकर, महेश कोळेकर, नंदकुमार उपासे , पोपट शिंदे, पिंटू झांबरे, उल्हास पाटील, सागर कडलासकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments