Rajya Sabha Election Highlights : चुरस , आक्षेप , उत्कंठा अन् सेलिब्रेशन ... राज्यसभा निवडणुकीचे टॉप 10 हायलाईट्स

 


Pandharpur Live Online:Rajya Sabha Election Key Points : हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला.

तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला.गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली तयारी, त्यानंतर आकड्यांची गणितं, मग मतदान आणि त्या दरम्यान घेतलेले आक्षेप, आरोप-प्रत्यारोप आणि शेवटी लागलेला निकाल. हा सर्व घटनाक्रम अत्यंत उत्कंठावर्धक होता. कालपासून आज पहाटेच्या निकालापर्यंतचे महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात...

1. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात होते. यातील सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती.

2. यासाठी काल सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. काल दुपारी 12 वाजता भाजपकडून जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदेंच्या मतदानावर आक्षेप घेतला.

3. काल दुपारी 1 वाजता निवडणूक आयोगाने भाजपचे आक्षेप फेटाळले. दुपारी 3 वाजता काँग्रेसने भाजपचे सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप घेतला. दुपारी 3.30 वाजता राज्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळले

4. भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेपाबाबत पत्र दिलं तर शिवसेनेकडून आक्षेपाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं.

5. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांची ऑनलाईन बैठक झाली. रात्री 10.15 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली

6. दरम्यान मविआ, भाजपनंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र दिलं. मध्यरात्री 12.15 वाजता संजय राऊत निवडणूक अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेले.

7. मध्यरात्री 1 वाजता सुहास कांदेंचं मत बाद ठरवलं. रात्री 1.15 वाजता विधानभवनाबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढला

8. रात्री 1.50 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली अन् 3 वाजून 7 मिनिटांनी संजय राऊत, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, अनिल बोंडे, पियूष गोयल विजयी घोषित करण्यात आले.

9. 3.45 वाजता भाजपच्या धनंजय महाडिक यांना विजयी घोषित करण्यात आलं.

10. धनंजय महाडिक यांनी 41.56 मते घेत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. पियूष गोयल, डॉ अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 तर इम्रान प्रतापगढी यांना संजय राऊत यांना 41, प्रफुल्ल पटेल यांना 43 मतं मिळाली.

Post a Comment

0 Comments