विरोधकांच्या सभांना पैशावरची गर्दी - युवराज पाटील

 


विरोधकांच्या सभांना पैशावरची गर्दी - युवराज पाटील

विठ्ठलची निवडणूक लढण्यासाठी विरोधकांनी उसने अवसान आणले आहे.

सभांमध्ये गर्दी करण्यासाठी, तरुणांचा उपयोग केला जात आहे. यासाठी त्यांना आर्थिक रसदही पुरवली जात आहे. याचा काडीमात्र उपयोग होणार नाही, अशी टीका युवराज पाटील यांनी विरोधकांवर केली. याप्रसंगी गणेश पाटील, ॲड. दीपक पवार, करकंबचे सरपंच विठ्ठल पांढरे, माजी सरपंच

दिलीप पुरवत यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

विठ्ठल कारखान्याची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रस्थापितांनी कारखाना अधोगतीस नेल्यामुळे, अनेक पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये बड्या बड्या मंडळींचा समावेश आहे. त्यांच्या सभांना तरुणांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु ही गर्दी शेतकरी सभासदांची नसून व्यवस्थापन करून केलेली गर्दी आहे. अनेक रिकाम्या तरुणांना पैशाचे आमिष दाखवून सभांमध्ये पाठवले जात असल्याचा आरोप, युवराज पाटील यांनी विरोधकांवर केला आहे.निवडणूक म्हटले की प्रचारसभा आल्याच. या प्रचारसभांमध्ये मोठी गर्दी व्हावी, अशी तयारी उमेदवारांकडून केली जाते. विरोधकांच्या सभांना होणारी गर्दी ही याच प्रकारची गर्दी आहे. शेतकरी सभासदास याचे काहीही देणेघेणे नाही. अशी टीका युवराज पाटील यांनी नाव न घेता विरोधकांवर केली आहे. सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना आणि आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.चौकट


विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. प्रत्येक पॅनलच्या सभा आणि बैठका गावोगाव सुरू आहेत. यावरूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांच्या सभेतील गर्दी ही पैशावरची गर्दी आहे, सभासदांनी भूल थापांना बळी पडू नये, असे आवाहन युवराज पाटील यांनी करकंब येथील सभेत केले आहे.

Post a Comment

0 Comments