पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला!
फुलचिंचोली: (सावता जाधव )
धन्य ते अरण!
रत्नाची खाण!!
जन्मला तो निधान!
सावता सागर!
प्रेमाचे आगर!!
या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे.कामातच देव मानणाऱ्या कांदा, मुळा, भाजी आवघी विठाई माझी अशी ओळख असणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी कानड्या विठुरायाच्या पालखीचे प्रस्तान काल रविवार(दि.२४ जुलै)रोजी झाले.
आषाढी एकादशीच्या अगोदर संताच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होतात. परंतु अपवाद फक्त संत शिरोमणी सावता माळीयांची पालखी येत नाही तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी अरण येथे संत सावता माळी यांच्या हे विशेष म्हणावे लागेल. आज सकाळी काशी कापडी समाजाच्या मठातून हजारो भाविक भक्तांच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवून प्रस्थान करण्यात आले.
विठ्ठल मंदिरातुन मानकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेऊन, विधिवत पूजा करण्यात आली. या पादुकांमध्ये विठलाचा वास येतो असे सांगितले जाते. यानंतर पादुका पालखीत ठेवून अरण कडे प्रस्थान झाले. तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचून संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जगाचा देव असणारा पांडुरंग भक्ताच्या म्हणजे संत सावता माळी यांच्या भेटीस जातो यामुळे या सोहळ्यास अत्यंत महत्त्व आहे.
या सोहळ्याचे महत्व वाढत आहे.
पांडुरंगाची पालखी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भेटीस जाते. पूर्वी याकडे पालखी सोहळ्यात जास्त वारकरी नसायचे परंतु आता या सोहळ्याचे महत्त्व वाढत आहे.ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. पूर्वी शेकडो वारकरी असायचे परंतु आता हजारो वारकरी पालखी समवेत दिसत आहेत.या सोहळ्याचे सावता परिषदेच्या माध्यमातून आणखी महत्व वाढवणार आहे.
कल्याणराव आखाडे, सस्थापक,सावता परिषद
0 Comments