पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची "एमडाॅक्स" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड* *पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची "एमडाॅक्स" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*

पंढरपूर: प्रतिनिधी 


"एमडाॅक्स" हि एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी संप्रेषण, माध्यम आणि वित्तीय सेवा प्रदाता आणि डिजिटल उपक्रमांसाठी साॅफ्टवेअर सेवांमध्ये तज्ञ आहे. अशा कंपनीत पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील सुमेरा शेख व सुशांत बारजे हे दोन विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये पास होणार आहेत तत्पूर्वीच सिंहगड कॉलेजच्या कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन शिक्षण पुर्ण होण्यापूर्वी कॅम्पस मुलाखतीतून नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.

        पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची माहिती देऊन प्लेसमेंट पुर्व संपुर्ण तयारी करून घेतली जाते. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच नामवंत असलेल्या कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात उद्योग क्षेत्रासह सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम झाला. अनेक ठिकाणी उद्योग, व्यवसाय बंद पडले तसेच रोजगार कमी झाले. कोविडचा संसर्ग कमी झाल्याने आता पुन्हा अर्थचक्र गतिमान होऊ लागले आहे. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातून कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या आकर्षक वेतनावर प्लेसमेंट मिळू लागले असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.       "एमडाॅक्स" या कंपनीत निवड झालेल्या सुमेरा शेख, सुशांत बारजे या विद्यार्थ्यांना कंपनीकडून वार्षिक ५ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. संदीप लिंगे आदीसह काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments