व्हर्टिकल स्टुडीओ ‘’एक उल्लेखनीय यशस्वी वास्तुकला क्षेत्रातील प्रयोग- प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण*कोविड-१९  महामारीमध्ये सर्व शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण पद्धतीस मुकलेले होते. त्यामध्ये  वास्तुकला हा  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी काही अपवाद ठरलेले नाहीत. ५ वर्षे शैक्षणिक कालावधी असलेल्या ह्या अभ्यासक्रमातील २ वर्ष  विद्यार्थी  काही प्रमाणात शैक्षणिक व सर्वांगीण  मौलिक  शिक्षणास ते मुकलेले आहेत

विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व  वास्तुकले सारख्या अभ्यासक्रमातील विविध विषयांतील रस वाढण्यासाठी तसेच त्यांना विषयाचा सखोल परिचय होण्यासाठी श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,आंबेगाव बीके पुणे -४१ ने ‘’ व्हर्टिकल स्टुडीओ ‘’ हा एक अलौकिक प्रयोग राबविला. ज्यामध्ये कोविड-१९ कालावधी मध्ये प्रवेश घेतलेले आणि त्यापूर्वी प्रवेशित  विद्यार्थ्यांचे एकत्रितपणे काही महत्वाचे विषय ज्या मध्ये वास्तुकलेचा गाभा असलेल्या डिझाईन सारखे विषय शिकवले गेले.

या मध्ये तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थांनी सह भाग घेऊन एक विकसनशील गावाचे  सखोल सर्वेक्षण करून विकास आराखडा बनविण्याचे काम केले आहे. यासाठी त्यांनी ४ गावे निवडली होती.

ऐतिहासिक वारसा असलेले व भविष्यात उज्वलतेसाठी डोकाऊ पाहू लागलेले फलटण, वाहतूक ,रहदारी समस्येत अडकलेले धार्मिक स्थळ रांजणगाव, हायवे रस्त्यातून विस्कुरलेले शिरवळ, शहरीकरण व  पर्यटनास गुरफटलेले  निसर्ग रमणीय पांचगणी गावे निवडली होती.२५-३० विद्यार्थी चमूने गावामध्ये जाऊन ,राहून, मोजमापे गावातील कुटुंबे व वास्तू सर्वेक्षण ,सुंदर वारसा,स्थळे इंव्हेनटरी,उच्च मान्यवर लोकांशी चर्चा –संवाद ,छायाचित्रे, हस्त रेखांकन व्हिडीओ द्वारे सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून  त्यांनी आरखडे,रेखाटणे निकष तयार केले. त्यातून तेथील महत्वाच्या समस्या,अडचणी,मागण्या,गरजांचा अभ्यास केला होता.व त्यावरील तोडगे अर्थात नियोजित विकास आराखडा व त्यांचे आर्किटेक्चरल डिझाईन ( अर्बन डिझाईन आणि हौसिंग प्रोजेक्ट) करण्यास सुरवात केली.

या प्रयोगामुळे दोन्ही वर्ग समूहाने एकत्रित काम अगदी सहज केले. त्यामुळे ओळख,स्फुर्ती,ज्ञान लवकर आत्मसात करता आले. कमी वेळात विद्यार्थी मनोबल उंचावले व काम करण्यास प्रेरणा व वेग आला.या प्रयोगामुळे अवलोकन करण्याची क्षमता खूप सुधारली .शिकवणे आणि शिक्षण घेणे दोन्ही क्रिया शिक्षकास व विद्यर्थ्यास खूप सोप्या व यशस्वी वाटल्या.

या प्रयोगामध्ये डिझाईन दर्जा नक्कीच सुधारला  व कोरोना काळातील अभ्यासाचे नुकसान भरून काढणेस मदत झाली.

या प्रयोगास संवाद, प्रश्नमंजुषा, नाट्यस्वरूप, वर्गीकरण समूह व स्पर्धात्मक प्रयोग स्फुर्तीसाठी बक्षिसे व कौतुक माध्यमे  निवडली गेल्यामुळे मुलांचा व शिक्षकांचा सहभाग जास्त वाढत गेला व तो त्यांनी आनंदात यशस्वीपणे पार पाडला.

फलटण,रांजणगाव, शिरवळ, पांचगणी येथील स्थानीक प्रशासनाने आणि रहिवाशांनी सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कामाची नोंद घेतलेली असून प्रशंसा केलेली आहे. तसेच पायाभूत सुविधांसाठी काही प्रस्तावित प्रकल्पा मध्यें सहभागासाठी आमंत्रण दिले आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी विद्यार्थाना प्रा. रवींद्र राहिगुडे, प्रा.नितीन शिऊरकर, प्रा. अनघा देओस्थळे, प्रा.अमोल दहीवडकर प्रा. स्वाती तगारे, प्रा.योगिता पंडित प्रो. मैथिली कुलकर्णी , प्रा. प्राजक्ता पवार, प्रा, जुईली शिरोडकर या   शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण व विभागप्रमुख प्रा. शोभन केळकर यांनी अभिनंदन केले आहे. वास्तुकला अभ्यासक्रम प्रभावी पणे शिकवण्यासाठी ‘’व्हर्टिकल स्टुडीओ ‘’ ह्या संकल्पनेची मोठी मदत होईल अशी अपेक्षा योजनेचे संकल्पकार प्राचार्य डॉ.सुधीर चव्हाण यांनी व्यक्त केली आहे .

Post a Comment

0 Comments